डॉक्टरांचा आज देशव्यापी संप; रुग्णांचे हाल – eNavakal
आरोग्य देश

डॉक्टरांचा आज देशव्यापी संप; रुग्णांचे हाल

नवी दिल्ली – ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करणारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज देशभरात बंद पुकारला आहे. आज सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासांसाठी हा संप असणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील ४५ हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसेवा कोलमडली असून रुग्णांना हाल सोसावे लागत आहेत. मुसळधार पावसात बाहेर गावांहून उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा प्रचंड संताप होत आहे. राज्यातील ठाणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव यांसारख्या अनेक भागांतील डॉक्टर आज संपावर आहेत.

संपकाळात आयएमएचे सर्व डॉक्टर आपली सेवा बंद ठेवतील. केवळ अत्यवस्थ रुग्णच तपासले जातील. इतर सर्व सेवा बंद ठेवून देशभरात निदर्शने, उपोषण व अन्य सनदशीर मार्गांनी निषेध नोंदवला जाईल, असे आयएमएने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार असून नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. फक्त ५ राज्यांना एकावेळी प्रतिनिधीत्व मिळेल. म्हणजे इतर राज्ये, विद्यापीठे आणि वैद्यकीय व्यावसायिक यांचा यात समावेश नसेल. त्सयामुळे सध्या १३४ सदस्य असलेल्या परिषदेचे कार्य २५ जण कसे सांभाळू शकतील?, असा प्रश्न आयएमएने उपस्थित केला आहे. तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फक्त पन्नास टक्के जागांचे शुल्क नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण ही फक्त धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अशा इतर उपचार पद्धतीच्या पदवीधारकांना, एवढेच नव्हे तर, आरोग्य व्यवस्थेसबंधित कोणासही म्हणजेच नर्सेस, टेक्निशियन किंवा सहाय्यक यांना जुजबी प्रशिक्षण घेऊन आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावेल, असे आक्षेप घेण्यात आले आहेत.

आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्यासाठी सदर शास्त्राचे पदवीधारक असण्याची अटच काढून टाकण्यात आली आहे. ही बाब गंभीर असून समाजाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आम्ही बांधील असल्यानेच या विधेयकाविरोधात संपाची हाक देण्यात येत असल्याचे एमसीआयने म्हटले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More