डे-नाईटसाठी टीम इंडिया सज्ज! गुलाबी चेंडूने खेळणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

डे-नाईटसाठी टीम इंडिया सज्ज! गुलाबी चेंडूने खेळणार

२२ नोव्हेंबरपासून इडन गार्डन येथे सुरू होत असलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या डे-नाइट कसोटी सामन्यास सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यान ही कसोटी गुलाबी चेंडूवर खेळवली जाईल. कसोटी लाल चेंडूवर खेळवण्यात येते. मात्र, दिवस-रात्र कसोटीत लाल चेंडू स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे गुलाबी चेंडूचा प्रयोग केला जाणार आहे. आतापर्यंत पाच देशांत गुलाबी चेंडूने कसोटी सामने झाले असून भारत आता सहावा देश ठरणार आहे.

चेंडू लवकर खराब होऊ नये यासाठी गुलाबी चेंडूवर लाल चेंडूपेक्षा अधिक रंग वापरण्यात आला आहे. मुळे चेंडूवर अधिक चमक देखील असते. चमक अधिक असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंगदेखील चांगले मिळेल. गुलाबी चेंडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणण्यासाठी ९ वर्षे संशोधन करण्यात आले. २००६ मध्ये गुलाबी कुकाबुरा चेंडूवर एका चॅरिटी सामना घेण्यात आला. त्यानंतर क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरेलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) चेंडू बनवणाऱ्या कंपनीला दिवस-रात्र सामन्यासाठी चेंडू बनवण्यास सांगितले. त्यानंतर कुकाबुराने ९ वर्षे संशोधन केल्यानंतर गुलाबी चेंडूचा निर्णय घेतला. पिवळा व नारंगी चेंडू देखील बनला. हे दोन्ही चेंडू टीव्हीवर पाहण्यास अडचण येत होती. अनेक कॅमेरामन म्हणाले की, या दोन्ही रंगांचे चेंडू पाहण्यास अडचण येत होती. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड पहिली दिवस-रात्र कसोटी लाल कुकाबुरा चेंडूवर खेळवण्यात आली.

सामन्याला दुपारी १ वाजता सुरुवात होईल. म्हणजे सामन्यात दोन्ही वेळेला फ्लड लाइटचा वापर होईल. कसोटीत एका चेंडूवर ८० षटकांचा खेळ होतो. लाल चेंडू फ्लड लाइटमध्ये स्पष्ट दिसत नाही. तर वनडेत वापरला जाणारा पांढरा चेंडू लवकर खराब होतो. त्यामुळे ९ वर्षे संशोधन केल्यानंतर दिवस-रात्र कसोटीसाठी गुलाबी चेंडू सर्वाधिक उपयुक्त ठरल्याचे आढळून आले. आतापर्यंत एकूण ८ देशांत ११ कसोटी सामने दिवस-रात्र खेळवण्यात आले. सर्वाधिक पाच सामने ऑस्ट्रेलियात, दोन सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये झाले. त्यासह इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यात एक-एक लढत झाली.

डे-नाईट कसोटीचा इतिहास पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना २०१५ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला. तेव्हापासून ते आतापर्यंत ११ डे-नाईट कसोटी सामने खेळले गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्वच सामन्यांचा निकाल लागला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More