‘डेथ ओवर्स’चा बादशाह बुमराह – eNavakal
क्रीडा

‘डेथ ओवर्स’चा बादशाह बुमराह

मुंबई – टी-20 सामन्यात खास करून हाणामारीच्या षटकात (डेथ ओवर्स)मध्ये आपण आताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये बादशाह असल्याचे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने येथे झालेल्या आयपीएल चषक स्पर्धेतील पंजाबविरुद्धच्या महत्त्वाच्या परतीच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी करून मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मुंबईने ही थरारक लढत अवघ्या 3 धावांनी जिंकून स्पर्धेतील ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या आशा कायम राखल्या आहेत. त्याने 4 षटकात अवघ्या 15 धावा देऊन पंजाबचे महत्त्वाचे 3 बळी टिपले. त्यांना आपल्या दुसर्‍या षटकात अवघी 1 धाव देताना पंजाबचा धडाकेबाज सलामीवीर गेलचा महत्त्वाचा बळी मिळवला. त्यानंतर कर्णधार शर्माने त्याला शेवटच्या हाणामारीचा षटकासाठी राखून ठेवले. मग त्याच्याकडे पुन्हा चेंडू सोपवला तेव्हा पंजाबला 9 षटकात अवघ्या 91 धावा करायच्या होत्या. त्यावेळी राहुल आणि फिंच ही त्यांची जोडी चांगली खेळत होती. सामन्यातील 17 व्या षटकात त्याने फिंचला बाद केले. नंतर 19 व्या षटकात राहुलचा महत्त्वाचा बळी घेऊन सामन्याचे विजयाचे पारडे मुंबईच्या बाजूने फिरवले. बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More