डी वॉर्डामध्ये मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांनी केली तोडफोड – eNavakal
News मुंबई

डी वॉर्डामध्ये मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

मुंबई- गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यास परवानगी न देणे तसेच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे प्रकार सध्या ग्रांटरोड भागात सुरू असून त्यामुळे याचा जाब विचारण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला डी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांनी भेट न दिल्याने संतप्त झालेल्या मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांची खुर्चीच कार्यालयाखाली आणून त्यांच्या खुर्चीला हारफुले वाहीली.

गणेशोत्सव मंडळावर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे मनसेचे विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली काही मनसेचे शिष्टमंडळ डी विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांना भेटण्यास गेले होते. दुपारी पावणे बाराच्या सुमारास ही सर्व मंडळी सहाय्यक आयुक्तांना भेटण्यास गेले असता, त्यांनी या मंडळींना भेट देण्यास नकार दिला. यावेळी या लोकांची आणि मोटे यांची बाचाबाची झाली. त्यानंतरही मोटे यांनी भेट न दिल्यामुळे ते अधिकच आक्रमक झाले होते.

दरम्यान, त्या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि त्यांचे दोन शिवसैनिक पोहोचले. त्यांनीही मोटे आणि प्रशासनाविरोधात तीव्र राग व्यक्त करण्यास सुरुवात करून दरवाज्यावर लाथा मारण्यास सुरुवात केली. तेव्हाच मनसेचे पदाधिकारीही आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जिन्यावरून खाली फेकून दिली. त्यानंतर याच खुर्चीला हारफुले वाहून त्यांची प्रतिकात्मक पूजा केली. पोलिसांनी मनसे, शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

कर्णधार विराटचे शतक! बंगळुरूच्या 213 धावा

कोलकाता-आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू – कोलकाता लढतीत बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या दमदार शतकामुळे प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगळुरूने 20 षटकांत 4 बाद 213...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर...
Read More