डिजिटल वाहन परवाना दाखवण्यास मंजुरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश वाहतूक

डिजिटल वाहन परवाना दाखवण्यास मंजुरी

नवी दिल्ली – बऱ्याचदा बाहेर जाताना वाहनाची कागदपत्रे, लायसन्स, पीयुसी, इंन्शुरन्स सोबत ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अडवल्यास भुर्दंड  भरावा लागतो. परंतु आता या असे करावे लागणार नाही. कारण माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल केल्याने वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तर वाहनचालकही आपल्या अॅपवरून कागदपत्रे दाखवू शकणार आहेत. सध्या

डिजिलॉकर हे अॅपच अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध आहे. मात्र, एम-परिवाहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवाहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या बऱ्याच तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि मोटार वाहन कायदा 1988 मध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी

पुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More