डासांच्या अड्ड्यांच्या शोध घेण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स – eNavakal
News मुंबई

डासांच्या अड्ड्यांच्या शोध घेण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स

मुंबई – मुंबईत डास प्रतिबंधक उपाययोजनांची अमलबजावणीचा भाग म्हणून सोसायटी आणि घराघरांमध्ये डेंग्यू व मलेरियाच्या अळ्यांचा शोध घेतला जातो. यासाठी यंदा खासगी स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओची मदत घेतली जाणार आहे. या एनजीओच्या माध्यमातून ३६८ कामगारांची मदत घेतली आहे. या कामगारांची स्पेशल टास्क फोर्स तयार करून डासांचे अड्डे नष्ट केले जाणार आहे.
पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध स्तरावर उपक्रम हाती घेऊन उपाययोजना राबवली जाते. मुंबई महापालिकेच्या कीटक नाशक विभागाच्यावतीने सध्या गाड्यांचे टायर, नारळ, प्लास्टिक बॉटल्स, करवंट्या नष्ट केल्या जात आहेत शिवाय  अनेक छपरांवर पाणी साचण्याची शक्यता असेल, तर त्या भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित केला जावा आदीबाबत सूचना केली जाते.
यंदाच्या पावसाळ्याचा  सामना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कीटक नाशक विभाग सतर्क असून या प्रतिबंधक उपाय योजना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी एनजीओची मदत घेतली जात आहे. एनजीओच्या ३६८ कामगारांची मदत घेतली जात आहे.  महापालिकेचे किटक नाशक  अधिकारी राजन नारिंगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वयंसेवी संस्थामार्फत ३६८ कामगारांची मदत घेऊन डेंग्यू व मलेरियाच्या अळया नष्ट केल्या जाणार आहे. या कामगारांच्या कामाला शुक्रवार पासून सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत  यांची मदत घेतली जाणार आहे. यासर्वाना किमान वेतन याप्रमाणे प्रतिदिन  ५७६रुपये याप्रमाणे वेतन दिले जाणार आहे. यासर्वांची स्पेशल टास्क फोर्स बनवून  युद्धपातळीवर अशाप्रकारचे डासांचे अड्डे नष्ट केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी जिथे जिथे डासांचे अड्डे तयार झाले होते,  अशा ठिकाणच्या अड्ड्यांवर  ही टास्क फोर्स विशेष लक्ष देऊन राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More