डम्पिंग प्रश्नी मनसे आक्रमक; आयुक्तांचा होर्डिंगला घातला बांगड्यांचा हार – eNavakal
आंदोलन मुंबई

डम्पिंग प्रश्नी मनसे आक्रमक; आयुक्तांचा होर्डिंगला घातला बांगड्यांचा हार

कल्याण- आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेली गेली तीन दिवस धुमसत असून या धुरामुळे त्रस्त नागरिकांनी रस्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला मनसेनेही या प्रश्नी आक्रमक पवित्रा घेत नागरिक डम्पिंग च्या धुराने त्रस्त असताना आयुक्त नागरिकांना चार दिवस बाहेर जाण्याच्या सल्ला कसा देऊ शकतात ,आयुक्त असंवेदनशील असल्याचा आरोप मनसेने केला .तसेच मनसे नगरसेविका ,पदाधिकारी आयुक्तांची भेट घेण्यास गेले असताना आयुक्तांची भेट न झाल्याने आयुक्तांचा होर्डिंग बनवून आयुक्त दालनाच्या दरवाजाला लावत बांगड्याचा हारघालत निषेध व्यक्त केला.गेले दोन दिवस लागोपाठ सुरू असलेल्या आंदोलना मुले डम्पिंग प्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे .

कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड गेल्या तीन दिवसापासून आगीच्या विळख्यात सापडले असून आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे आसपासचे नागरीक त्रस्त झाले आहेत .काल सायंकाळी त्रस्त नागरिकांनी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी करत रस्त्यावर उतरत रस्ता रोको करत संताप व्यक्त केला .तर आज सकाळी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डम्पिंग शेजारी रस्ता रोको करत कचर्याच्या गाड्या रोखल्या होत्या त्या पाठोपाठ डम्पिंग प्रश्नी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला .आज दुपारच्या सुमारास मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मांडले ,माजी आमदार प्रकाश भोईर ,जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर ,शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई ,महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला तांबे ,महिला शहर अध्यक्षा शीतल विखनकर ,नगरसेविका कस्तुरी देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेण्यासाठी आयुक्त दालन गाठले मात्र आयुक्त लग्नाला गेल्याने भेट होवू न शकल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकार्यांनी आयुक्त दालनाच्या दरवाजावर आयुक्तांचा होर्डिंग लावत त्याला बांगड्यांचा हार घालत आयुक्तासह प्रशासन व सत्ताधार्या विरोधात घोषणा बाजी करत आपला निषेध नोंदवला .यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अशोक मांडले यांनी आयुक्तांची नेमणूक शहरातील विकासावर लक्ष ठेवण्यासाठी केली जाते .पण गेले चार दिवस कल्याण डम्पिंग ग्राउंड ला आग लागत आहेत  नागरिकांना धुराचा त्रास होतोय अस होत असताना आयुक्तांनी तिथल्या लोकांना चार पाच दिवस नातेवाईकांकडे जावून रहा असा सल्ला दिला आयुक्तांचे हे विधान योग्य नाही ज्या शहराची जबाबदारी त्याच्याकडे आहे तो माणूस नागरिकांना वेठीस धरत लग्नाच्या पंती झोडत असेल तर आम्ही अशा आयुक्तांचा जाहीर निषेध करतो असे सांगत आज आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो मात्र आयुक्त लग्नाच्या गर्तेत असल्याने आम्हाला भेटले नाही म्हणून कार्यालया समोर त्याच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घातला ज्या माणसाला शहरात काम करण्याची धमक नसेल त्यांनी बांगड्या घालाव्या आणि शहराच्या बाहेर जावे पुढे परिस्थिती न बदलल्यास मनसे आपल्या स्टाईल ने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहिल्या राहणार नाही असा इशारा दिला

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More
post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More