ठामपा शाळा होणार हायटेक – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

ठामपा शाळा होणार हायटेक

ठाणे – ठाणे महापालिकेच्या शाळा खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यासाठी शाळांच्या कार्यपद्धातीमध्ये बदल करून नियोजनबद्धता आणण्याचा निर्णय शिक्षणाधिकार्‍यांनी निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना सर्वप्रथम अध्यापनाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र अध्यापन संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या एकूण 120 प्राथमिक शाळा व 16 माध्यमिक शाळा असून त्या 78 इमारतींमध्ये सकाळ व दुपारच्या सत्रात भरवल्या जात आहेत. या शाळांमध्ये सध्या 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मात्र या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सूचना द्यायची असल्यास ती अजूनही शिपायामार्फत नोटीस वही फिरवून द्यावी लागते. ही पद्धत कालबाह्य झाली असून खासगी शाळांमध्ये सध्या स्पीकरचा वापर केला जात आहे. त्यानुसारच पालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्पीकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्पीकर सगळया वर्गखोल्यांमध्ये लागणार असले तरी सूचना देण्यासाठी त्याचे केंद्रीयकरण केले जाणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More