ठाण्यात शिवसेना-भाजपाचा वाद चव्हाट्यावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

ठाण्यात शिवसेना-भाजपाचा वाद चव्हाट्यावर

मुंबई – सातत्याने एकमेकांवर आगपाखड करणार्‍या शिवसेना-भाजपा यांचे अखेर आगामी निवडणुकांसाठी युतीचे घोडे गंगेत न्हाले. असे असले तरी युतीत काही आलबेल आहे असे दिसत नाही. ठाण्यात शिवसेना आणि भाजपातील वाद उफाळून आला आहे. शिवसेना खासदार राजन विचारेंच्या उमेदवारीवरून भाजपा नगरसेवकांनी विरोध केला आहे.

विचारे यांना उमेदवारी नको असे साकडेच भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना घातले आहे. तसेच जर उमेदवारी दिली तर निवडणुकीत पक्षाला मदत करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे की, गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांमध्ये अडथळे आणण्याचे काम केले. तसेच जनतेशी उध्दटपणे वागणे यामुळे ठाणेकरसुध्दा विचारेंवर नाराज आहेत. या संदर्भात आपल्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यातही ही जागा शिवसेनेला देणे अपरिहार्य झाले तरीसुध्दा राजन विचारे यांच्याऐवजी दुसरे कोणतेही नाव द्यावे त्यांच्यासाठी आम्ही काम करू. मात्र राजन विचारेंचे काम करणार नसल्याचा इशाराही दिला आहे. तसेच ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे विधानसभेत नंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मेरीटनुसार भाजपाच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More