ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न – eNavakal
News महाराष्ट्र

ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे – गुन्ह्याच्या तपासातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी झालेल्या वाद यातून नैराश्य निर्माण झालेल्या महिला पोलीस उप निरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांनी सकाळी राहत्या घरी फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. देशमुख यांना त्वरित वेदांत रुग्णालयात वर्तकनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शारदा अंकुश देशमुख या पोलीस उप निरीक्षक या पदावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दाखल एका गुन्ह्यातील तपासाबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि पोलीस उप निरीक्षक शारदा देशमुख यांच्यात वाद झाला. वाद मनाला लावून घेत शुक्रवारी देशमुख यांनी घरातच फिनेल प्राशन केले.
त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्या बचावल्या. या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी त्वरित विजय दरेकर यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांच्याद्वारे चौकशीचे आदेश दिले. तर वरिष्ठ निरीक्षक विजय दरेकर यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची तडकाफडकी बदली ठाणे नियंत्रण कक्षात करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. याबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दरेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

सहार पोलीस ठाण्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज करण्याची मागणी

मुंबई- अंधेरी (पूर्व) येथील सहार पोलीस ठाण्याचे नाव बदलून त्याजागी छत्रपती शिवाजी महाराज पोलीस ठाणे असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी सहार गावातील शिवप्रेमी करत...
Read More
post-image
News मुंबई

झोपडपट्टीतील शौचालयांच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट! म्हाडाने हात झटकले

मुंबई- मुंबईसह उपनगरातील झोपडपट्ट्यातून म्हाडाच्या देखरेखीखाली बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा पालिकेचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने धुडकावला, अशी धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

‘त्या’महिलेचे घरकूल हरवले! प्रधानमंत्री योजनेचा ‘खेळ मांडला’

शहापूर, – प्रधानमंत्री घरकूल योजनेचे 2016/17 या कालावधीतील एकही मस्टर ऑनलाईन भरून सबमिशन न केल्यामुळे नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील 14 लाभार्थ्यांना प्रत्येकी 18 हजार नव्वद रुपयांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More