ठाण्यात प्रचार रॅलीमध्येच भाजप नगरसेवक भिडले – eNavakal
News महाराष्ट्र

ठाण्यात प्रचार रॅलीमध्येच भाजप नगरसेवक भिडले

ठाणे – पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणार्‍या भाजपचा बुरखा आयाराम नगरसेवकांमुळे अखेर फाटला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये भाजपचे दोन नगरसेवक आपसांत भिडल्याने आज खळबळ उडाली. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक कृष्णा पाटील आणि मनसेतून भाजपवासी झालेल्या नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड यांच्यात भररस्त्यात फ्री स्टाईल कुस्ती रंगली. अखेर, केळकर यांना मध्यस्थी करून हे भांडण सोडवावे लागले. उमेदवारांची रॅली कुठल्या भागातून फिरवायची. या क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले.
ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे उमेदवार संजय केळकर यांचा सध्या मतदार संघात प्रचार सुरु असून यानिमित्ताने आज शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जेव्हा ही प्रचार रॅली कोलबाड येथील प्रताप सिनेमाजवळ आल्यानंतर रॅली आपापल्या परिसरात फिरवण्यासाठी नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड आणि नगरसेवक कृष्णा पाटील यांच्यात वाद झाला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More