ठाण्यात पादचारी पुलाला कंटेनर धडकला! वाहतूक कोंडी – eNavakal
News महाराष्ट्र

ठाण्यात पादचारी पुलाला कंटेनर धडकला! वाहतूक कोंडी

ठाणे – ठाण्यात येनकेन प्रकारे वाहतूक कोंडी होतच असते.रस्त्यावरील खड्डे आणि मेट्रोच्या कामामुळे आधीच कोंडी सुरु असताना रविवारी मध्यरात्री भलामोठा कंटेनर कळवा रुग्णालयासमोरच्या रस्त्यावरील पादचारी पुलाला धडकल्याने पुणे व नवीमुंबईकडे जाणारी वाहतूक अडली. या अपघातामुळे कंटेनरचे नुकसान झाले असून तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कटरने कंटेनर कापून काढण्यात आला. दरम्यान, या अपघातामुळे ठाण्यात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यापूर्वीही नोव्हेंबर 2017 मध्ये अशाच एका अवजड कंटेनरने पुलाला धडक दिली होती.
दुचाकी वा मोटारी आदी वाहने वाहून नेणारा भलामोठा 40 फुटी कंटेनर भिवंडी येथे माल खाली करून कळवामार्गे पुण्याच्या दिशेने निघाला होता. रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कंटेनर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या समोर आला. तेव्हा,पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी उभारण्यात आलेल्या फूट ओव्हरब्रीजला कंटेनर धडकून पुलाखालीच अडकून पडला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक दाखल झाले. पथकाने कटरने कंटेनरचा वरचा भाग कापून काढल्यानंतर तब्बल दोन तासानंतर अडकलेला कंटेनर सोडवण्यात यश आले. या अपघातात कंटेनरच्या वरच्या भागाचे नुकसान झाले.हा कंटेनर हरयाणा राज्यातील होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More