ठाण्यातील रेमंडची 20 एकर जमीन 700 कोटीला विकली – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ठाण्यातील रेमंडची 20 एकर जमीन 700 कोटीला विकली

ठाणे-गेल्या काही दिवसांपासून रेमंड कंपनीने आपल्या मालमत्तेची विक्री करण्याचा जणू सपाटा लावला आहे. या कंपनीने आता ठाण्यातील 20 एकर जमीन 700 कोटी रुपयांत विकल्याची माहिती समोर आली आहे.
सिंगापूरच्या ‘इक्विटी’ या खासगी कंपनीने रेमंडचा हा भूखंड विकत घेतला आहे. रेमंडची सहकारी कंपनी असलेल्या जेके इन्व्हेस्टो लिमिटेडने मान्यता दिल्यानंतर रेमंडकडून ही जमीन विक्री झाली आहे. ही विक्री केलेली जमीन ठाण्यातील सिघांनिया शाळेला लागूनच आहे. हा भूखंड ठाण्यातील मोक्याच्या जागांपैकी एक मानला जातो. आगामी काळात 20 एकरांच्या या जागेवर मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले उभारली जाणार आहेत. या जागेवर संकुल उभारल्यानंतर वर्षाला 2 कोटी ग्राहक भेट देतील, अशी अपेक्षा आहे.
या संकुलाच्या माध्यमातून कंपनी सुमारे 4000 रोजगार उपलब्ध करणार आहे. बांधकाम क्षेत्राचा विचार केला तर ही ठाण्यातील मोठी परदेशी गुंतवणूक ठरेल असे मत रेमंडचे मुख्य कार्यकारी संचालक गौतम सिंघानिया यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यात रेमंडच्या मालकीची तब्बल 125 एकर जमीन आहे. यापैकी 14 एकर जमीन ‘रेमंड रिॲलिटी’ रहिवासी संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये 42 मजल्यांचे 10 टॉवर उभारण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ही कंपनी मुंबईतील परळमधील सहा एकर जागेवर निवासी संकुल उभारणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More