ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

ठाणे – शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचे सोमवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचे निधन झाले असून आज दुपारी 2 वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली आणि सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. तरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे व भाऊ असा परिवार आहे.

ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविले. त्यानंतर 1994 आणि 1995 सालीही त्यांनी महापौरपद भूषविले होते. ठाण्यात महापौरपदाची हॅट्ट्रिक साधणारे ते एकमेव नगरसेवक होते. 2000 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2006 मध्येही ते विधान परिषदेसाठी उभे होते. मात्र यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पराभूत केले होते. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते. तसेच 2008 मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. 2015 मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. शिवाय ते एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचे सामाजिक चळवळीतील योगदान मोठे होते. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News विदेश

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत ब्रिटनमध्ये बंदी

लंडन- ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कुख्यात गुंड रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई- कुख्यात गुंड रवी पुजारीला आज कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी...
Read More
post-image
देश

पाच राज्यांकडून पेट्रोल-डिझेलवर करकपात

नवी दिल्ली – दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि केंद्र व राज्य सरकारकडून...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मी फक्त माध्यमांपासून दूर गेलो होतो – संजय राठोड

वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर

वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत...
Read More