ठाणे मेट्रो 4 चा मार्ग मोकळा! 36 झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

ठाणे मेट्रो 4 चा मार्ग मोकळा! 36 झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी

मुंबई – ठाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणार्‍या मेट्रो 4 प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो मार्गात येणारी 36 झाडे तोडण्यास परवानगी देताना न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने 913 झाडांचे पुनर्रोपण काळजीपूर्वक करा, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला दिले.
ठाणे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीएमार्फत कासारवडवली (ठाणे) ते वडाळा मेट्रो 4 प्रकल्प उभारण्यात येणार्‍या प्रकल्पासह ठाण्यातील रस्ता रुंदीकरण, रस्ता बांधणी, गृहनिर्माण आदी 18 प्रकल्पांसाठी सुमारे 3800 झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड पर्यावरणाची परवानगी शिवाय केली जात असल्याचा आरोप करून ठाणे नागरी प्रतिष्ठान व रोहित जोशी यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर आज सुनावणी झाली. उभय पक्षांच्या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने झाडे तोडण्यास दिलेली स्थगिती आज उठवत एमएमआरडीएला मोठा दिलासा दिला.
ठाणे महापालिकेच्या वतीने अ‍ॅड.एम.एस. गोवाडकर यांनी वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेल्या परवानगीबाबत याचिकाकत्यार्र्ंना माहिती दिली असून पालिकेच्या संकेतस्थळावरही वृक्षतोडीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर याचिककर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. गायत्री सिंग यांनीही या वृक्षतोडीला तयारी दर्शविल्यानंतर न्यायालयाने 18 पैकी 6 विकास कामांसाठी वृक्षतोड करण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर इतर खाजगी प्रकल्पासाठी 2012 झाडे तोडण्याच्या परवानगीवर मात्र स्थगिती कायम ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वर्षावर बैठक

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस नव्या रुग्णांची भर पडत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More