ठाणे जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज होणार निवडणूक  – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र मुंबई

ठाणे जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज होणार निवडणूक 

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राजकिय पक्षांचे लक्ष लागले आहे. राजकीय बलाबल पाहता  ही निवडणूक अटीतटीचे होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती – उपसभापती निवडीनंतर जि.प.च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची ही निवड आठवडाभरानंतर होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत.

11 ते दुपारी 3 निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि 3 ते 3.30 अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.  जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी शिवसेनेकडे 26, भाजपाकडे 16, राष्ट्रवादी 10 आणि कॉग्रेस 1 असे पक्षीय बलाबल आहे. या पदांसाठी उमेदवारी प्राप्त झालेल्यांपैकी पसंतीच्या उमेदवारास बोट उंच करून पसंती दर्शवण्याची पद्धत या निवड प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo चेतन भगत म्हणतो ‘मीच पीडित’

मुंबई – #MeToo मोहिमेचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक चेतन भगतवर एका महिलेने अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला होता. परंतु...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कल्याण – डोंबिवलीकरांना उद्या पिण्याचे पाणी नाही

कल्याण – यंदाच्या कमी झालेल्या पावसाचे सावट राज्यात हिवाळ्यापासून  भासु लागले आहे. त्याचाच फटका ठाणे जिल्हवासियांसोबतच कल्याण, डोंबिवली येथे राहणाऱ्या जनतेलासुद्धा बसला आहे. ठाणे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जलयुक्त ‘शिव्या’र , राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मुंबई – फडणवीस सरकारने तथ्य व नियोजन नसलेल्या पण अती गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार व शेतक-यासाठी विहिरी सारख्या योजनांनी महाराष्ट्राला दिलासा देण्याऐवजी अस्वस्थच केल आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

डेंगूमुळे बाळाला जन्म देताच आईचा मृत्यु

अमरावती – अमरावती शहरात गेले कित्येक दिवस डेंगूच्या आजाराने जणजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज डेंगूचे पुन्हा दोन बळी गेल्याने खळबळ माजली आहे. यात धक्कादायक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More