ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांना 13 कोटींचा निधी मंजूर  – eNavakal
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांना 13 कोटींचा निधी मंजूर 

मुरबाड – जिल्हा परिषदेच्या काही वर्षांपासून नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गाला `नवसंजीवनी’ मिळणार आहे. तर काही शाळांमध्ये नवे वर्गही उभारले जाणार आहेत, अशी माहिती  ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यानी मुरबाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा टप्प्याटप्प्याने डिजीटल करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितलेे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शाळा दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केली. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे या कामाच्या निविदा निघून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये नवे वर्गही उभारले जाणार आहेत. या वर्गासाठी 13 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

सध्या अनेक शाळांमध्ये एक वर्ग डिजीटल करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचे शिक्षण द्यावे लागते. त्यामुळे सर्व वर्ग डिजीटल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील 133 पाणीयोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात विहिरीतून पाणीपुरवठा करणाऱ्या 20 योजनांचा समावेश आहे. या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षात जिल्हा परिषदेकडून आदिवासी भागातील शिक्षकांच्या भरतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे आदिवासी भागातील शाळांमध्ये 100 टक्के शिक्षक उपस्थित आहेत, असे पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील रस्त्यासाठी 42 कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी 5054 व 3054 योजनेअन्वये 42 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ग्रामस्थांच्या आवश्यकतेनुसार रस्ते उभारण्यात येणार आहे तर सिध्दगड हा महत्वाचा रस्ता 5054 अन्वये तयार केला जाणार आहे .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More