ठाणे जिल्हापरिषदेच्या व पंचायतसमिती च्या  निवडणुकी  साठी  भाजपाचे  शक्ती  प्रदर्शन – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

ठाणे जिल्हापरिषदेच्या व पंचायतसमिती च्या  निवडणुकी  साठी  भाजपाचे  शक्ती  प्रदर्शन

  मुरबाड- ठाणे जिल्हा परिषद व मुरबाड पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाने आज मुरबाड मध्ये रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले . भाजप आरपीआय आठवले गट व श्रमजीवी संघटना यांची युती असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यात सेना भाजपा युती करण्यास आमची तयारी होती . परंतू खासदारकीची स्वप्न पाहणा-या शिवसेनेतील एका नेत्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेऊन राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी युती केल्याचा आरोप त्यांनी केला . महाराष्ट्रात मुरबाड मतदार संघाचे विकासाची सध्या चर्चा चालू आहे . जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता भाजपाला द्या गावा गावांचा विकास करून दाखवेल . असे अवाहन केले .
          या सभेत आमदार किसन कथोरे माजी आमदार दिगंबर विशे , भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे , तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव , यांनी मार्गदर्शन केले. यासभेनंतर किसन कथोरे यांच्या म्हसा रोड वरील जनसंपर्क कार्यालया पासून निघालेली रॅली शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , व नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून तहसीलदार कार्यालयात पोहचली . भाजपातर्फे पंचायत समितीच्या सोळा व जिल्हा परीषदेच्या आठ जागा करीता अर्ज भरण्यात माञ उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More