ठाकरे चित्रपटातील बाळासाहेबांचा आवाज बदलणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठाकरे चित्रपटातील बाळासाहेबांचा आवाज बदलणार

मुंबई – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिकचा हिंदी तसेच मराठी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र मराठी ट्रेलरमधील बाळासाहेबांच्या आवाजाला चाहत्यांनी फारशी पसंती दिली नाही. मराठी अभिनेते यांनी खेडेकर यांनी हा आवाज दिला आहे. परंतु बाळासाहेबांचा आवाज हा कसा भारदस्त होता त्यांच्यासमोर सचिन खेडेकर यांचा आवाज फिका पडत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. यामुळे आता बाळासाहेबांचा चित्रपटातील आवाज बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. यासाठी तीन जणांच्या आवाजाच्या चाचण्या घेतल्या असून त्यापैकी एकावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More