ठाकरे चित्रपटाच्या प्रदर्शनावर दमानियांचा आक्षेप – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

ठाकरे चित्रपटाच्या प्रदर्शनावर दमानियांचा आक्षेप

मुबंई – बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर रेखाटलेल्या ठाकरे चित्रपटातील काही संवादांवर सेंसॉर बोर्डाने कात्री लावण्याचे आदेश दिल्यानंतर आता त्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर देखील चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी 25 तारखेला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार असून त्या दिवशी कोणताही सिनेमा प्रदर्शित करू देणार नसल्याचा इशारा दिला होता, त्यावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे, लोकांवरती जुलूमशाही गाजवणाऱ्या शिवसेनेची अशी हिंमत तरी कशी होते. अशा लोकांना तुरुंगात टाकावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर तुम्हाला शिवसेनेची 2019मध्ये गरज वाटत असेल म्हणुन तुम्ही त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही, असा आरोप दमानियांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे, त्यामुळे हा वाद  आणखी चिघळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.


‘ठाकरे’ चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे, त्यादिवशी कोणताही चित्रपट चालवायला देणार नाही, अशी पोस्ट चित्रपट सेनेचे सरचिटनिस बाळा लोकरे यांनी फेसबूकवरून शेअर केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर हे शिवसैनिकाचे वैयक्तिक मत असून शिवसेनेची यासारखी कोणतीच भूमिका नाही. त्यामुळे या चर्चेला पुर्णविराम द्यावा या प्रकारचे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले होते, मात्र अंजली दमानिया यांनी बाळा लोकरेंच्या पोस्टवर आपले प्रतिउत्तर देत शिवसेना तसेच मुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची गरज असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेच्या दादागिरीवर कोणतीच कारवाई करत नाही, असा आरोप देखील दमानियांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More