ठरलं! ‘चांद्रयान-2’ २२ जुलै रोजी झेपावणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

ठरलं! ‘चांद्रयान-2’ २२ जुलै रोजी झेपावणार

श्रीहरीकोटा – भारताच्या बहुप्रतिक्षीत ‘चांद्रयान 2’ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले. आता हे प्रक्षेपण येत्या सोमवारी, २२ जुलै रोजी दुपारी २२.४३ वाजता होणार आहे. GSLV Mk-3 या बाहुबली प्रक्षेपकाच्या सहाय्याने ‘चांद्रयान 2’ आकाशात झेपावणार आहे.

१५ जुलै रोजी प्रत्यक्ष प्रक्षेपणाला ५६ मिनिटे २४ सेकंद उरलेले असताना क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 2चे उड्डाण होणार होते.

चांद्रयान-२च्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर कोणताही देश पोहोचू शकलेला नाही. मात्र भारताने ही मोहीम पार पाडली तर भारत हा चंद्राच्या जमिनीवर उतरणारा चौथा देश ठरेल. तसेच जागतिक स्तरावर वैज्ञानिक समुदायाला याचा फायदा होईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्याची किरणं तिरकी पडतात. त्यामुळे येथील तापमान खूपच कमी असते तर बहुतांश भागावर कायम अंधार असतो. त्याशिवाय या ठिकाणी मोठ-मोठे खड्डेही आहेत. या खड्ड्यांचे तापमान -२५० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास पोहोचते. इतक्या कडाक्याच्या थंडीत लँडर आणि रोवरला चालवणे मोठे आव्हानात्मक आहे. चांद्रयान या ध्रुवावर केवळ ६ मिनिटे राहू शकते.

इस्रोने चांद्रयान-२ ला सन २०१७ मध्ये प्रक्षेपित करण्याचे ठरवले होते. मात्र काही चाचण्या शिल्लक असल्याने त्याचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. भारताच्या पहिल्या चांद्रयानात लँडर आणि रोव्हरचा समावेश नव्हता. या वेळी लँडर आणि रोव्हर या मोहिमेचा भाग असणार आहेत.

चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये

१. भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

२. या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ध्रुवावर आजवर जगातील कोणत्याच देशाचे यान पोहोचलेले नाही.

३. चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

४. चांद्रयान-2चे वजन आठ हत्तींच्या वजनाइतके म्हणजेच 3.8 टन इतके आहे.

५. यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

६. रोव्हरला ६ चाके आहेत. जे अशाेक चक्राच्या धर्तीवर तयार केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More