ट्रेकिंगला येणाऱ्या पर्यटकांना सावधतेचा ईशारा – eNavakal
अन्य महाराष्ट्र

ट्रेकिंगला येणाऱ्या पर्यटकांना सावधतेचा ईशारा

जुन्नर- जुन्नर तालुक्यातील  ऐतिहासिक जीवधन केल्यावर ट्रेक करण्यासाठी अनेक गिर्यारोहक व पर्यटक येथे नेहमीच येत असतात. हा किल्ला सर करण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरुन पडल्याच्या दोन घटना नुकत्याच झाल्या आहे त्यामुळे सावधतेचा ईशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे.
अनेकांना किल्ला ट्रेक करण्याचा अनुभव नसताना देखील तो सर करण्याचा प्रयत्न केला जातो खरा पंरतु वेगळाच अनर्थ घडत असल्याच्या दोन घटना येथे घडल्या याच ऐतिहासिक जीवधन किल्ल्यावर पाय घसरुन चिंचवड पुणे येथील संदीप मारुती बोरकर वय 37 हे जखमी झाले . ते आपला पुतण्या गणेश बोरकर व भारत चिंचवडे यांच्यासह शनिवारी ता. 7 ला किल्ल्यावर आले होते. त्यांनी रात्री येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या मार्गाने खाली येत असताना पाय घसरून ते खाली पडले. पायास लागल्याने त्यांना खाली येणे शक्य होत नव्हते. त्यांच्यासोबत असलेल्यांनी जुन्नर पोलिसांशी संपर्क केला.  जुन्नर चे पोलिस निरीक्षक कैलास घोडके, वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे तसेच त्यांच्या सहकारी व पोलिस कर्मचारी यांच्या या सर्व रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनंतर त्यांना स्ट्रेचर वरुन खाली आणले. यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळून नातेवाईकांनी त्यांना घरी नेले. यामुळे पर्यटकांनी व गिर्यारोहकांनी काळजी घेणे गरजेचे असून तुमची एक चूक जीवघेणी घडू शकते असे सांगण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More