टेस्लाच्या उपाध्यक्षांची अॅपलमध्ये वापसी – eNavakal
तंत्रज्ञान विदेश

टेस्लाच्या उपाध्यक्षांची अॅपलमध्ये वापसी

कॅॅलिफोर्निया – अॅॅपलचे माजी उपाध्यक्ष डग फिल्ड हे पुन्हा एकदा अॅॅपलमध्ये परतले. टेस्ला वाहनाचे मुख्य अभियंता म्हणून २०१३ मध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी अॅॅपल सोडले होते. अॅॅपलने दिलेल्या माहितीनुसार फिल्ड हे कंपनीत परतले असून त्यांची टायटन या प्रकल्पावर काम करण्यासाठी नियुक्ती झाली आहे. ‘सेल्फ ड्रायव्हिंग कार प्रोग्रॅम’ असा हा प्रकल्प असणार आहे.

फिल्ड टेस्लामध्ये वाहन निर्मिती आणि अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. परंतु यावर्षी पहिल्या त्रैमासिक काळात मॉडेल ३चे यश मिळविण्यात कंपनी अपयशी ठरल्याने टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आणि फिल्ड यांना मे महिन्यात सक्तीच्या रजेवर पाठवले. यानंतर जून महिन्यात फिल्ड यांनी टेस्लाला रामराम ठोकला. परंतु आता टायटन प्रकल्पाच्या निमित्ताने फिल्डची अॅॅपलमध्ये वापसी झाली आहे.

 

 

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

19 ऑगस्टला हरिद्वारमध्ये अटलजींचे अस्थिविसर्जन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी सायंकाळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसईतील नुकसानग्रस्त रहिवासी आजही शासन मदतीपासून वंचित

वसई –  वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात जुलै महिन्यात मोठी अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी आणि सोबत पुराचे पाणी चक्क नागरिकांच्या घरात,दुकानात रस्त्यावर आदी ठिकाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

‘इसोव’नी रचला भारतासाठी नवा इतिहास 

नवी दिल्ली – स्वित्झर्लंड मध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल स्पर्धेत अंदमान निकोबारच्या अवघ्या १७ वर्षीय इसोव अल्बानने रौप्य पदक जिंकून भारतासाठी नवा इतिहास...
Read More
post-image
महाराष्ट्र

माळशेज घाटात पर्यटकांची झुंबड

मुरबाड – पर्यटकांच्या सुरक्षितेच्या हेतूने ठाणे जिल्ह्याचे तात्कालीन कार्यरत  जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळ माळशेज घाटातील सर्व  धबधबे व इतर पर्यटक स्थळांवर...
Read More