टी -२० मध्ये मिलरच्या वेगवान शतकाच्या विक्रमाची रोहित शर्माने केली बरोबरी – eNavakal
क्रीडा देश

टी -२० मध्ये मिलरच्या वेगवान शतकाच्या विक्रमाची रोहित शर्माने केली बरोबरी

इंदूर  –  मुंबईकर रोहित शर्माने पुन्हा एकदा तुफान बॅटिंग केली आहे.  ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे तर रोहितने डेव्हिड मिलरच्या अगोदरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

श्रीलंकेविरुद्ध खेळताना  रोहित शर्माने आज पुन्हा तुफान हल्लाबोल चढवला. त्यामुळे श्रीलंकन बॉलर हाताश झालेले पाहायला मिळाले. लंकेच्या बॉलरची धुलाई करताना टी-20 मध्ये रोहित शर्माने टी-20मधील सर्वात वेगवान शतक ठोकले. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे.  ४३ बॉलमध्ये १२ चौकार 10 षटकार मारले आहेत. रोहितची फटकेबाजी पाहताना वाटत होते की, तो सहज द्विशतक ठोकेल. मात्र, तो ११८ धावांवर बाद झाला. टी-२० सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली आहे. आता इंदूरमध्ये होत असलेली मॅचही जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More