टीम इंडियाचे विमान जमिनीवर – eNavakal
क्रीडा देश लेख

टीम इंडियाचे विमान जमिनीवर

गेले काही महिने आकाशात उंच भरारी घेणार्‍या विराट कोहलीच्या टीम इंडियाचे विमान मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 आणि वनडे मालिकेतील पराभवामुळे जमिनीवर स्थिरावले आहे.  ऑस्ट्रेलियाने या विजयाबरोबरच आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी आणि वनडे मालिकेतील पराभवाची लगेचच परतफेड केली. तसेच भारतीय भूमीत दिल्ली सर करून डबल धमाकादेखील साजरा केला.

तब्बल 28 महिन्यांच्या मोठ्या अवधीनंतर टीम इंडियाला मायदेशात वनडे मालिका गमवावी लागली. तर 10 वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर ऑस्ट्रेलियाने भारतात वनडे मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद केली. वनडे मालिकेत सुरुवातीला 2-0 अशी आघाडी घेऊन मालिका दोन वेळा गमवणारा भारत हा पहिला क्रिकेट देश ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेेला थोडाच अवधी बाकी असताना भारतीय संघासाठी हा पराभव निश्चितच धोक्याची घंटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी आणि वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम विराट सेनेने अगोदर करून दाखवला होता. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर खेळणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पुन्हा सहज लोळवेल, अशीच आशा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी ही मालिका सुरू होण्यापूर्वी करत होते. पण भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशेवर टीम इंडियाने सुमार खेळ करून पाणी फेरले. ऑस्ट्रेलियात खेळाच्या तीनही अंगात चमकदार कामगिरी करणार्‍या भारतीय संघाची कामगिरी आपल्या घरी मात्र चांगलीच ढेपाळली त्यामुळे दोन्ही मालिका गमवण्याची नामुष्कीची पाळी भारतीय संघावर आली.

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने काही धाडसी निर्णय या मालिकेत संघव्यवस्थापनाने घेतले. पण त्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. हे निर्णय योग्य ठरले नाहीत. ऑस्ट्रेलियन संघात काही प्रमुख खेळाडू नसताना त्यांनी मिळविलेला हा विजय निश्चितच कौतुकास्पद आहे. बड्या खेळाडूंच्या गैरहजेरीत फिनने संघाचे चांगले नेतृत्व केले. एक नवा विश्वास त्यांनी युवा खेळाडूंमध्ये निर्माण केला. वनडे मालिकेत 2-0 असे पिछाडीवर पडून पुढचे सलन तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत केलेल्या जोरदार कमबॅकला तोड नाही. चौथ्या सामन्यात 359 धावांचा यशस्वी पाठलाग ऑस्ट्रेलियाने करून आपले मालिकेतील आव्हान कायम राखले. सर्वात मोठ्या धावसंख्येचा ऑस्ट्रेलियाने वनडेत यशस्वी पाठलाग करून त्यानंतर दिल्लीदेखील सर करण्यात यश मिळविले. त्यांचा सलामीवीर उस्मान खावजाने मालिकेत दमदार फलंदाजी केली. त्याने दोन शतके काढताना सर्वाधिक धावा केल्या. त्याला हँडकॉबने चांगली साथ दिली. तर वेगवान गोलंदाज कमिन्स आणि फिरकी गोलंदाज झम्पाने आपली कामगिरी चोख बजावली.

विराटने आपल्या चमकदार फलंदाजीचा ठसा पुन्हा एकदा मालिकेवर उमटवला पण त्याच्या सहकार्‍यांकडून म्हणावी तशी साथ विराटला मिळाली नाही. त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा- शिखर धवन ही सलामीची जोडी एक सामन्याचा अपवाद वगळता मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरली. मधल्या फळीतील फलंदाजांना सातत्याने मोठी धावसंख्या काढता आली नाही. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेत मधल्या फळीबाबत मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याचादेखील फैसला या मालिकेत झाला नाही. गेले काही महिने चौथ्या क्रमांकासाठी निवड समिती नव्यानव्या खेळाडूंना संधी देत आहे, पण त्या क्रमांकावर कुठल्याच फलंदाजाला अद्याप आपली जागा निश्चित करता आली नाही. तब्बल चौदा फलंदाजांना संधी देण्यात आली. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत, अष्टपैलू विजय शंकर, रवींद्र जडेजा यांचे स्थान धोक्यात आले आहे.

भारतीय संघासमोर अनेक समस्या या मालिकेमुळे निर्माण झाल्या आहेत. संघव्यवस्थापन आणि कर्णधार विराट या समस्यांवर कसा तोडगा काढणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल. आगामी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडमधील वातावरण आणि वेगवान गोलंदाजांना साथ देणार्‍या खेळपट्ट्या भारतीय संघाची परीक्षा घेणार. त्यामुळे विश्वचषक विजेतेपदासाठी भारताला  कठीण परिस्थितीतून सामोरे जावे लागणार आहे. तर या मालिकेतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाला विश्वचषक स्पर्धेसाठी नवी संजीवनी मिळाली आहे, असे म्हणावे लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील ‘त्या’ पोलीस उपायुक्ताचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई – कोरोनाचा वाढता कहर पाहता याची लागण आता कर्तव्यदक्ष असणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांत देखील आढळून येत आहेत. मुंबईतील अशाच एका पोलीस उपायुक्त म्हणजेच डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यात कोरोनाची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

परिसर सील असतानाही वरळी कोळीवाड्यातील नागरिकांचा बोटीने प्रवास; ५ जण अटकेत

मुंबई – कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी-कोळीवाडा हा भाग सील करण्यात आला आहे. असे असतानाही या भागातील लोक किराणा आणण्यासाठी समुद्रमार्गे माहीमला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर...
Read More
post-image
ट्रेंडिंग

वाघ, सिंह तुमच्याही घरात आलेत का? गुगलचं ‘हे’ फिचर वापरून पाहा!

कोरोना, लॉकडाउन आणि सोशल मीडिया सध्या याच गोष्टी कानावर पडत आहेत. त्यातही अनेकजण सकारात्क आणि मजेशीर गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश

फळं आणि भाज्या लवकर खराब होऊ नये, यासाठी काय करावे?

लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडणे शक्य नाही. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर जाणे योग्यही नाही. त्यामुळे सतत बाजारात जाणे शक्य नसल्याने घरातील अन्नधान्य, भाज्या, फळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोदींनी ‘या’ देशातून कॉपी केली दिवे पेटवण्याची संकल्पना

मुंबई – कोरोना व्हायरसविरोधात भारत देश एकवटला आहे, हे दर्शवण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ब्लॅकाऊट करून फक्त दिवे, मेणबत्त्या, मोबाईल टॉर्चर पेटण्याचे...
Read More