नवी दिल्ली- सिरिजच्या अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये 410 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने 5 विकेट गमावल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 31 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाने जर हा सामना जिंकला किंवा अनिर्णितही राहिला तरीही भारत सलग नऊ सिरीज जिंकल्याच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करेल. उपहारापर्यंत श्रीलंका 4 बाद 119 धावा केल्या. उपहारापूर्वी जडेजाने नो बॉल टाकल्याने जीवदान मिळालेला चंडिमल उपहारानंतर अश्विनच्या हातून मात्र बचावला नाही. अश्विनने चंडिमलला ३६ धावांवर बोल्ड केले. तर डिसिलव्हा शतकाच्या नजीक आहे.
