‘टीम इंडिया’ची देशभक्ती पाकच्या डोळ्यात खुपली, कारवाईची मागणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

‘टीम इंडिया’ची देशभक्ती पाकच्या डोळ्यात खुपली, कारवाईची मागणी

नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी झालेल्या सामन्यात सीआरपीएफ जवानांची टोपी म्हणजेच ‘आर्मी कॅप’ घालून मैदानात उतरली. तसेच संघातील सर्व खेळाडूंनी या सामन्याचे सर्व मानधन राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना वाहिलेली श्रद्धांजली पाकिस्तानच्या डोळ्यात खुपली आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद खान यांनी आक्षेप घेत भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करण्यासाठी आयसीसीला मागणी केली आहे.

आर्मी कॅप घालून भारतीय संघाने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल करावी. जर भारतीय संघाने आर्मी कॅप घालणं थांबवलं नाही, तर पाकिस्तान संघही विश्वचषकात, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात काळ्या फिती लावून मैदानात उतरेल, असे फवाद चौधरी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More