टिटवाळ्यात देवी विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा काळू नदीत बुडून मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र

टिटवाळ्यात देवी विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा काळू नदीत बुडून मृत्यू

टिटवाळा – दुर्गादेवी विसर्जनासाठी गेलेल्या एका सार्वजनिक मंडळाच्या चारजणांचा काळू नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. बुडून बेपत्ता झालेल्या या तरुणाचे मृतदेह शोधण्याचे काम आज सकाळपर्यंत सुरू होते.
काळू नदीत बुडालेल्या या चौघांची नावे विश्वास तुकाराम पवार (35), रुपेश तुकाराम पवार (22), सिद्धेश अनंत पार्टे (22) व सुमीत मारुती वायदंंडे (26) अशी आहेत. टिटवाळा पोलीस ठाणे हद्दीतील मांडा टिटवाळाजवळच्या वासुंद्री गावालगत काळू नदीवर ओमकारेश्वर सदन तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते देवी विसर्जनासाठी गेले होते. रात्री बाराच्या सुमारास मंडळाचे 8 तरुण देवीची मूर्ती घेऊन काळू नदीच्या पात्रात उतरले.
यावेळी देवीची मूर्ती कलंडली आणि हे तरुण खोल पाण्यात पडले. यापैकी पोहता येणारे सहा तरुण बाहेर आले. पण दोघेजण बुडत असल्याचे दिसताच त्यातील दोघांनी त्यांना वाचविण्यासाठी पुन्हा पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्याचा प्रवाह व खोली जास्त असल्याने ते चौघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले. रात्री अंधार असल्यामुळे ते दिसेनासे झाले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिकांनी पहाटे चारपर्यंत बेपत्ता तरुणांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More