टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला नाही. त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप प्रचंड गाजलं. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाला असल्याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या आहेत. दोघांना आपलं मैत्रीचं नातं अधिक योग्य वाटत असल्याने दोघे एकमेकांच्या संमतीने वेगळे झाले असल्याचे समजते आहे. अलीकडेच दिशाने भारत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, टायगरसोबतचं नातं मैत्रीपलीकडे नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘बागी २’ चित्रपटात त्यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिशा युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह डिनरला गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यांच्यामुळे दिशा आणि टायगरच्या नात्यात चढउतार आल्याचे म्हटले जात आहे. मात्र दिशाने भारत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आपले टायगरवरील प्रेम व्यक्त केले होते. त्यामुळे या दोघांनी एकमेकांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More