टाटांविरुद्धची याचिका कोर्टाने फेटाळली – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र मुंबई

टाटांविरुद्धची याचिका कोर्टाने फेटाळली

मुंबई- टाटा सन्सच्या चेअरमनपदावर प्रथमच टाटा आडनाव नसलेले सायरस मिस्त्री यांची नियुक्ती झाली आणि नवीन अध्याय सुरू होईल असे वाटले होते, मात्र काही काळातच सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात वाद झाले, ज्याची अखेर सायरस मिस्त्रींना चेअरमनपदावरून हटविण्यात झाली. यानंतर संतप्त झालेले सायरस मिस्त्री यांनी रतन टाटांवर गंभीर आरोप करीत त्यांच्यावर खटला भरला. आज राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने सायरस मिस्त्रींची याचिका पूर्णपणे फेटाळून लावली. सायरस मिस्त्रींना हा मोठा फटका आहे. हा निर्णय देताना प्राधिकरणाने म्हटले की, टाटा समूहाच्या व्यवस्थापकीय मंडळात कोणतीही गडबड नाही. कोणतेही चुकीचे व्यावसायिक निर्णय घेतले गेलेले नाहीत, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More