झेवियर्समध्ये ‘मल्हार’ची धूम!  – eNavakal
मुंबई

झेवियर्समध्ये ‘मल्हार’ची धूम! 

मुंबई – नृत्य-नाट्याच्या मेजवानीसह सांस्कृतिक, बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल असणार्‍या ‘मल्हार’ फेस्टिव्हलचे आयोजन मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमध्ये करण्यात आले आहे. १५, १६ आणि १७ ऑगस्ट अशा तीन दिवस रंगणार्‍या या फेस्टिव्हलच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये सध्या ‘मल्हार’चीच धूम सुरू आहे.

मल्हारमध्ये विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारचे वर्कशॉप, चर्चासत्र, संवाद असे विविधांगी कार्यक्रमही होणार आहेत. याशिवाय संगीत आणि नाट्य स्पर्धा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या महोत्सवाची सुरुवात ‘कॉन्फ्युएन्स’ कार्यक्रमाने होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीच्या मल्हारमध्ये साधारणपणे सुमारे बाराशे विद्यार्थ्यांची वर्कफोर्स मिळून तीन महिने प्रचंड मेहनत करून हा भव्य मल्हार महोत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी झटत आहेत. या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर सेलिब्रिटी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या करीअरमधील यशस्वी वाटचालीचे अनुभव शेअर करणार आहेत. याचा मोठा फायदा उद्याच्या भारताचे भविष्य असणार्‍या विद्यार्थ्यांना होणार आहे. यातून त्यांच्या करीअरला दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

काळाच्या प्रवास गाथेची थीम
यावर्षीच्या मल्हार फेस्टिव्हलची थीम ‘काळाची प्रवास गाथा’ अशी अशी ठेवण्यात आली आहे. भविष्यातील प्रगतीचा मार्ग निवडताना भूतकाळातील अनुभव लक्षात घेऊन कशी प्रगती साधायची याचे धडे दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळणार आहे. मल्हारबद्दल बोलताना विद्यार्थी म्हणातत की, मल्हारमध्ये आम्हाला नवीन विचार तर मांडता येतातच, शिवाय अनेक नवीन गोष्टी शिकताही येतात. त्यामुळे दरवर्षी आम्ही मल्हार महोत्सवाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More
post-image
देश

आम्हाला तुमचा अभिमान, पाकिस्ताननं केली भारताची स्तुती

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत केली आहे. एअर इंडियानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे, जीवनावश्यक...
Read More
post-image
देश

लॉकडाऊन संपल्यानंतरच घेणार शाळा-महाविद्यालयांबाबत निर्णय

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. इयत्ता दहावीचा एक पेपर रखडला आहे. तर, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा...
Read More