झाड घरावर कोसळून तीन  जखमी – eNavakal
News महाराष्ट्र

झाड घरावर कोसळून तीन  जखमी

डोंबिवली -जुने  चिंचेचे झाड मुळासकट उन्मळून एका घरावर कोसळल्याने घरातील तीन जण जखमी झाले असून 3 दुचाकींसह घराचेही मोठे नुकसान झाले . ही घटना कल्याण पश्चीमेकडील उंबर्डे गावात सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

दोन दिवसापासून कल्याणसह आसपासच्या परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे  उंबर्डे गावातील भिमनगर येथे राहणाऱ्या भारत जाधव यांच्या घराशेजारील सुमारे 80 वर्षापूर्वीचे जुने चिंचेचे झाड मुळासकट उन्मळून त्यांच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेत या घराची भिंत लगतच्या घरात असणाऱ्या रोहन जाधव याच्या अंगावर कोसळल्याने तो जखमी झाला असून रोहनची आई गीता आणि बहिण वृषाली यांनाही दुखापत झाली .

तर घरातील सामानासह  घराचेही मोठी पडझड होवून नुकसान झाले . तर या दुर्घटनेत झाडा शेजारी उभ्या असलेल्या 3 दुचाकीचेही नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी झाड घरावरून हटवण्याचे काम हाती घेत मदतकार्य सुरु केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

प्रसिद्ध नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

मुंबई- मदर्स डे, वन रूम कीचन, दुधावरची साय, चाॅईस इज युवर्स, यू टर्न, हिमालयाची सावली अशा काही नाटकांची निर्मिती करणारे प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण...
Read More
post-image
अर्थ देश

एअरटेल, वोडाफोन, आयडिया कंपन्यांच्या योजनावर “ट्राय”ची बंदी

नवी दिल्ली – खासगी दूरसंचार क्षेत्रामध्ये अंबानींच्या जिओ कंपनीने इतर कंपन्यांना हादरवून सोडले आहे. त्यामुळे आपले ग्राहक जपण्यासाठी भारती एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या...
Read More
post-image
विदेश

नेल्सन मंडेला यांच्या मुलीचे निधन

डेन्मार्क – दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची कन्या झीडझी मंडेला यांचे आज सकाळी जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 59...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‌Breaking: यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा शक्यच नाहीत! आजच्या बैठकीत निर्णय

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona) परीक्षा घेण्यासंदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाही. मात्र राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. तसेच, इतर राज्यांशी...
Read More
post-image
विदेश

ड्रायव्हरने जाणूनबुजून बस घातली तलावात, २१ जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनमध्ये एका ड्रायव्हरने जाणूनबुजून बस तलावात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे २१ जणांचा मृत्यू झालाय. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती....
Read More