ज्वेरेव, निशिकोरी, ग्रिगोरला झुंजवले – eNavakal
क्रीडा विदेश

ज्वेरेव, निशिकोरी, ग्रिगोरला झुंजवले

पॅरीस – यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेव, जपानच्या काई निशीकोरी आणि बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमोत्रौव्ह यांना कडा संघर्ष करावा लागला. दुसर्‍या फेरीच्या सामन्यात ज्वेरेवला सर्बियाच्या ड्युसान लोजोविकने जोरदार झुंज दिली. अखेर 5 सेटमध्ये ज्वेरेवने ही लढत जिंकली. आता तिसर्‍या फेरीच्या सामन्यात ज्वेरेवचा मुकाबला 26 व्या मानांकन देण्यात आलेल्या बोसेनीयाच्या डॅनिरशी होईल. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत ज्वेरेवने आतापर्यंत कधीच उपांत्यपूर्व फेरी गाठलेली नाही. जर्मनीच्या या युवा खेळाडूकडून टेनिस विश्व मोठ्या अपेक्षा बाळगुन आहे. यंदा त्याने 3 मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहे. तर 2 स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 23 वर्षीय ज्वेरेने पहिल्या सेट गमावून देखील पुढचे 3 सेट जिंकून अखेर बाजी मारली. बल्गेरियाच्या ग्रिगोरला अमेरिकेच्या जेयर्डने 4.5 तास जोरदार झुंज दिली. अखेर 5 सेटमध्ये ग्रिगोरने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील आपल्या 50 व्या विजयाची नोंद केली. आता त्याचा मुकाबला स्पेनच्या फर्नांडोशी होईल. हाताच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या निशिकोरीला देखील दुसरी लढत जिंकताना बरेच कष्ट घ्यावे लागले. बेनॉटविरुद्धची ही लढत निशिकोरीने अखेर 5 सेटमध्ये जिंकली. गतवर्षी अमेरिकन स्पर्धेत निशिकोरी उपविजेता ठरला होता. महिला एकेरीत ऑस्ट्रेलियन स्पर्धा विजेत्या कॅरोलिनाने दुसर्‍या फेरीची लढत जिंकताना जॉर्जीयाच्या गॅरीसाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी – द्विवीज शरण जोडीने विजयी सलामी दिली. भारतीय जोडीने शरण राजा – मार्टिन को चा 3 सेटमध्ये पराभव केला. रोहन बोपण्णा आणि त्याचा सहकारी वेसलीन जोडीने देखील पहिल्या फेरीत विजय मिळवला.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More