ज्वुटेनसच्या विजयात रोनाल्डोची चमक – eNavakal
News क्रीडा विदेश

ज्वुटेनसच्या विजयात रोनाल्डोची चमक

नेपोली – इटालियन साखळी फुटबॉल स्पर्धेत ज्वुटेनस क्लबने नेपोली क्लबचा 3-1 गोलांनी पराभव केला तो त्यांचा खेळाडू रोनाल्डोच्या शानदार कामगिरीमुळे. या ज्वुटेनसच्या तिन्ही गोलांत रोनाल्डोचा हातभार होता. सामन्यातील पहिला गोल नेपोलीच्या ड्राईसने केला, पण त्यानंतर ज्वुटेनस संघाने सामन्यात जोरदार कमबॅक करून 3 गोल केले आणि शानदार विजयाची नोंद केली. यंदाच्या मोसमात आपले 8 विजेतेपद मिळवण्यासाठी ज्वुटेनस संघ जोरदार प्रयत्न करत आहे. सध्या या स्पर्धेत 7 लढतीत 21 गुण मिळवून त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नेपोली संघ गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे, रोनाल्डोने त्यांचा गोल केला, तर 2 गोल करणार्‍या मॅडुस आणि डेव्हिड यांना रोनाल्डोने दिलेल्या पासवरच गोल करण्यात यश आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More