ज्योतिरादित्य शिंदेंनी ट्विटरवरून हटवली काँग्रेसची ओळख – eNavakal
News देश

ज्योतिरादित्य शिंदेंनी ट्विटरवरून हटवली काँग्रेसची ओळख

भोपाळ – काँग्रेसचे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील काँग्रेसची ओळख हटवली आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलवर फक्‍त समाज सेवक आणि क्रिकेटप्रेमी असे लिहिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मध्य प्रदेशमधील काँग्रेसमध्ये तीन गट आहेत. एक गट कमलनाथ यांचा आहे. दुसरा गट ज्योतिरादित्य शिंदे यांचा आणि तिसरा गट दिग्विजय सिंह यांचा आहे. या तिन्हीही गटात वर्चस्वाची लढाई होत आली आहे. वर्षभरापुर्वी काँग्रेसने भाजपला पराभवाची धूळ चारत बर्‍याच वर्षानंतर काँग्रेसची सत्ता राज्यात परत आणली होती.
मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्रिपदाची माळ कमलनाथ यांच्या
गळ्यात पडली. त्यावेळीपासूनच ज्योतिरादित्य शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी एकतर मुख्यमंत्रिपद किंवा मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केली पण अद्यापपर्यंत त्यांची ही मागणी मान्य झालेली नाही. आज अचानक त्यांनी आपल्या ट्वीटरवरून काँग्रेसची ओळखच हटवली. याबाबत खुलासा करताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, काँग्रेसपासून अलिप्त होत असल्याच्या चर्चा निराधार आहे. महिन्याभरापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमध्ये बदल केला. लोकांनी केलेल्या सूचनांमुळे मी माझा बायो छोटा केला. सध्या या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही आधार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More