ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन – eNavakal
News महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन

सोलापूर – तेलगू व मराठी साहित्यातील दुवा म्‍हणून ओळखले जाणारे ज्येष्‍ठ साहित्यिक, कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज सायंकाळी घरात लेखन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना शहरातील मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्यावर शनिवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बोल्ली यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
तेलुगू भाषिक कुटुंबात जन्म घेऊनही लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व होतं. तेलुगू भाषेचे जाणकार, उत्तम कवी आणि समीक्षक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. ‘एका साळियाने’ हे त्यांचे आत्मचरित्र फार गाजले. तेलुगू आणि मराठी भाषेत त्यांची जवळपास २४ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याला स्थान देण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेशमधील पोट्टी श्री रामुलू विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केलंय’

पुणे -संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला दिलेले  ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे, कारण शरद पवारांनी सगळ्यांनाच गारद केले आहे, असे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

युजीसीशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय- उदय सामंत

मुंबई – अंतिम विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात असे आदेश युसीजीने दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संभ्रमात भर पडली असल्याची टीका राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षणं मंत्री उदय सामंत यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सत्ताधारी घरात बसलेत, आम्ही जनतेकरता राजकारण करतो- देवेंद्र फडणवीस

जळगावत – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

सारथी संस्थेचे सारथ्य आता अजित पवारांच्या हातात! सारथी संस्थेला तातडीने ८ कोटी दिले!

मुंबई – मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्यासाठी उभी केलेली ‘सारथी’ संस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या मदत आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जागतिक कंपन्यांनी भारतात यावं, विविध क्षेत्रात प्रचंड संधी, नरेंद्र मोदींचे आवाहन

नवी दिल्ली – भारतातील अर्थव्यवस्था सुधरत आहे, त्यामुळे जगभरातील कंपन्यांनी भारतात यावं, भारतात विविध क्षेत्रात प्रचंड संधी आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
Read More