ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे निधन

सोलापूर – ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास निधन झाले. ते ८८वर्षाचे होते. सोलापुरात वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, एक पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गो. मा. पवार यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो. मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले असून पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोलापुरात त्यांच्या ‘मुदिता’ निवासस्थानी धाव घेऊन दिवंगत डॉ. पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More