ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन – eNavakal
News महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

पुणे – राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.  पुना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाईंनी पुण्यातील पुना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी देशातील अनेक चळवळीत भाग घेतला होता. उद्या दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.  राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे आज वयाच्या 89 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. भाईंनी पुण्यातील पुना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी देशातील अनेक चळवळीत भाग घेतला होता. भाई वैद्य यांच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याच निदान झाले होते. त्यामुळे चार दिवसापुर्वीच त्यांना पुण्यातील पुना रुग्णालायतील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना वैद्य यांचे शरीर प्रतिसाद देत नसल्याने अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. आठ महिन्यांपुर्वी त्यांची अँजीओप्लास्टी करण्यात आली होती. आणीबाणीदरम्यान त्यांनी 19 महिने कारावास भोगला होता. चले  जावच्या  आंदोलनात ते सहभागी झाले होते .त्यावेळी भाई 19 महिने तुरुंगात होते. 25 वेळा विविध आंदोलनावेळी त्यांना कारावासात जावे लागले होते. गोवा मुक्ती आणि सयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी भाग होता. त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नांमतार विधेयक भाईंनी माडले होते. त्याना पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पेन्शनराचे वेतने महागाईशी जोडले होते. पोलिसांना फुल पॅट देण्याचा निर्णय भाईंचाच होता.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More