ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे निधन

नवी दिल्ली – ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचं बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत निधन झालं. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्भीड, निपक्षपाती पत्रकार म्हणून त्यांची देशभरात ओळख आहे. पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.

पत्रकार कुलदीप नायर यांचा जन्म १९२३ साली झाला. स्वातंत्र्य काळातील पत्रकारिता त्यांनी केली. सर्वप्रथम त्यांनी उर्दू भाषेतून पत्रकारितेस सुरुवात केली, त्यांनतर ते इंग्रजी पत्रकारीतेकडे वळले. त्यांनी ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्रासाठी काम केलं.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचा कार्यकाळ त्यांनी जवळून पहिला. इंदिरा गांधींच्या महत्त्वाच्या निर्णयांंवर त्यांनी पुस्तकं लिहिली. १९७५ साली आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही झाली होती.

१९४७ ते २०१५ या काळात त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधींवर त्यांनी लिहिलेली पुस्तकं प्रचंड गाजली. भारताचे ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More