ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची मागणी – eNavakal
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची मागणी

मुंबई – मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा ही सर्वांचीच प्रबळ इच्छा आहे. मात्र या इच्छेला राजकीय शक्तीची जोड मिळताना दिसत नसल्याची टीका एनयुजे महाराष्ट्र आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केली आहे. सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा म्हणून एनयुजे महाराष्ट्र आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने बेळगाव या दीदींच्या जन्मगावाजवळ आज नियोजित साहित्य संमेलनात दीदीना फाळके पुरस्कार मिळावा हा ठराव मांडला. एनयुजेएम बेळगाव जिल्ह्याच्यावतीने सह्यांची मोहिमही राबवली गेली. भांडूप येथील गणेश सेवा मंडळाने आज आणि उद्या रविवारी पनवेलला आम्ही कलावंत सामाजिक संघटना सह्यांची मोहिम राबविणार आहेत.

शिवसेना प्रमुखांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे कसाबला फाशी आणि सुलोचनादीदींना फाळके पुरस्कार मिळावेत हे दोन विषय दिले होते. राष्ट्रपती पदी विराजमान झालेल्या प्रतिभा पाटील या बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला आल्या तेव्हा नाराज झालेल्या बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील यांच्याशी बोलणे टाळून पाठ फिरवली. बाळासाहेबांची ही इच्छा अपूर्ण राहिली. महाराष्ट्रात सत्तेत शिवसेना आहे.केंद्रात सत्तेत भागीदार आहेत. पण नव्वदी पार केलेल्या दीदींना हा पुरस्कार मिळावा, मराठी कलावंताचा सन्मान व्हावा, म्हणून पुढाकार घेत नाही.
राज्यातले फडणवीस सरकार मराठी कलाकारांना दुय्यम स्थान देत आले असल्याचा आरोपही एनयुजेमहाराष्ट्र आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केला आहे. तसेच आमच्या मायमाऊलीला हा सन्मान असा मागून मिळण्यापेक्षा तो स्वतःहून सरकारने देण्याची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दीदींना जन्मदिनाचे शुभेच्छापत्र पाठवतात, त्यांना दीदींचे योगदान माहित नसेल तर ते माहित करुन देण्याची वेळ आली आहे. सगळ्यांची इच्छा शक्तीत रुपांतरीत करण्याचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एनयुजेचा हा प्रयत्न आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More