ज्युनिअर अभियंताला लाचेच्या गुन्ह्यांत अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

ज्युनिअर अभियंताला लाचेच्या गुन्ह्यांत अटक

मुंबई- भांडुप येथील महानगरपालिकेच्या एस वार्डमध्ये ज्युनिअर अभियंता असलेले राहुल जगन्नाथ लोखंडे यांना गुरुवारी 35 हजार रुपयांच्या लाचेच्या गुन्ह्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. यातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचा भांडुप परिसरात एक हॉटेल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता हॉटेलची दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ही माहिती मिळताच राहुल लोखंडे व त्यांच्या पथकाने संबंधित बांधकाम तोडून टाकले होते. या घटनेनंतर तक्रारदार हे राहुल लोखंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या भांडुप येथील महानगरपालिकेतील एस वार्डमध्ये गेले होते. यावेळी हॉटेलमध्ये पुन्हा दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी त्यांनी अर्ज करुन त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्याला परवानगी देण्यासाठी राहुल लोखंडे यांनी त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी 35 हजार रुपयांची लाच देण्याची तयारी दाखवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी सकाळी या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना ज्युनिअर अभियंता राहुल लोखंडे यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. राहुल लोखंडे यांच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More