जोगेश्‍वरीत घातक शस्त्रांसह आलेल्या गुन्हेगारास अटक – eNavakal
News मुंबई

जोगेश्‍वरीत घातक शस्त्रांसह आलेल्या गुन्हेगारास अटक

मुंबई,- जोगेश्‍वरी येथे घातक शस्त्रांसह आलेल्या एका गुन्हेगाराला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. इम्रान खुर्शीद हसन सय्यद असे या 27 वर्षांच्या गुन्हेगाराचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सुमारे बावीसहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.

जोगेश्‍वरी येथे काहीजण एका गंभीर गुन्ह्यांसाठी घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या पथकातील गंगाधर मुदीराज, वाहिद पठाण, धोंडी सावंत, चंद्रकांत गवेकर, प्रमोद कांबळे, सुनिल रोकडे, सचिन ठोंबरे यांनी जोगेश्‍वरीच्या पश्‍चिम दुतग्रती महामार्गावरील सर्व्हिस रोड, पादचारी पुलाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी तिथे इम्रान हा आला होता, इम्रान हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याला ओळखले, त्यानंतर पळून जाण्याची संधी न देता त्याला पोलिसांनी शिताफीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडले. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. तपासात इम्रान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध चोरी, जबरी चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात बावीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याला मुंबईसह ठाणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. ही कारवाई सुरु असतानाच तो मुंबई शहरात एक गंभीर गुन्ह्यांसाठी घातक शस्त्रे घेऊन आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More