जोगेश्वरीमध्ये आरोपीस अटक व पोलीस कोठडी – eNavakal
News मुंबई

जोगेश्वरीमध्ये आरोपीस अटक व पोलीस कोठडी

मुंबई,- जोगेश्वरी येथे एका 19 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून पळून गेलेल्या बलात्कारी आरोपीस सोमवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण जर्मन जातव असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कारासह अन्य भादंवि कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 19 वर्षांची ही पीडित मुलगी कोलकाताची रहिवासी आहे. सध्या ती तिच्या आई आणि चार भावंडांसोबत जोगेश्वरी परिसरात राहाते. नववी नापास असल्याने तिला जोगेश्वरीतील एका शाळेत तिच्या आईने प्रवेश घेतला होता.

याच परिसरात लक्ष्मण हा राहात असून तो तिच्या परिचित आहे. काही दिवसांपूर्वी तो तिच्या घरी गेला होता. यावेळी तिचे दोन भाऊ घरात होते. यावेळी त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करू लागला. मात्र तिने नकार दिल्यानंतर तो तेथून निघून गेला होता. 13 ऑगस्टला ही तरुणी खासगी शिकवणीसाठी जात होती. यावेळी तो इमारतीच्या खालीच उभा होता. त्याने तिला इमारतीच्या मागील बाजूस नेले आणि तिथेच एका कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. घरी आल्यानतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर ते दोघेही ओशिवरा पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी लक्ष्मणविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह बलात्काराचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच सोमवारी त्याला जोगेश्वरी परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची लवकरच पोलिसांकडून मेडीकल होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

जपानमध्ये आणीबाणी लागू होण्याचे संकेत

टोकियो – कोरोनाने जगातील तब्बल 190 देशाला विळखा घातला आहे. त्यातून आर्थिक ताकद असलेला जपानही दूर राहिलेला नाही. तेथे आतापर्यंत 3 हजार 654 जणांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील शेतात गर्भवती महिलेची हत्या

जुन्नर – देशभरातील जनता कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असताना जुन्नर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More