जोकोविच-फेडरर अंतिम लढत – eNavakal
News क्रीडा

जोकोविच-फेडरर अंतिम लढत

सिनसिनाटी – जागतिक टेनिस क्रमवारीत पुरुष गटात दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या रॉजर फेडरर आणि दहाव्या क्रमांकावर असणार्‍या नोव्हाक जोकोविच यांच्यात येथे सुरू असलेल्या सिनसिनाटी आंतरराष्ट्री मास्टर्स टेनिस स्पर्धेची अंतिम लढत होईल. रॉजरने तब्बल 7 वेळा अगोदर ही स्पर्धा जिंकली आहे. तर जोको मात्र आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोने क्रोएशियाच्या मरिन सिलिकचा तीन सेटमध्ये पराभव केला. जोकोने ही लढत 6-4, 3-6, 6-3 अशी जिंकली. पहिला सेट जिंकून जोकोने सामन्यात चांगली सुरूवात केली. दुसरा सेट मात्र मरीनने जिंकून सामना बरोबरीत आणला. पुन्हा तीसर्‍या सेटमध्ये जोकोने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करून सामना आणि सेट खिशात टाकला.
दुसर्‍या सामन्यात रॉजरने डेव्हिड गॉफिनचा दोन सेटमध्ये पराभव केला. गेल्या दोन वर्षात दुखापतीमुळे या दोन बड्या खेळाडूंमध्ये कुठल्याच स्पर्धेत अंतिम मुकाबला झाला नव्हता. उभय खेळाडूंमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या लढतीत 45 पैकी 23 लढतीत जोकोने बाजी मारली. रॉजरने येथे सलग 14 सामने जिंकले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More