जैन समुदायाने मोर्चा काढताच, शेळी, मेंढीची निर्यातच केंद्राने बंद केली – eNavakal
News आंदोलन

जैन समुदायाने मोर्चा काढताच, शेळी, मेंढीची निर्यातच केंद्राने बंद केली

नागपूर – शेळ्या, मेंढ्या निर्यात करण्याची अधिक व्यापक योजना केंद्र सरकारने जाहीर केली होती. या योजनेचा मूहूर्त आज होणार होता. त्यासाठी नागपूरचे विमानतळ सज्ज केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विमानतळावर हजर राहणार होते. ज्याच्या शेळ्या-मेंढ्या निर्यात केल्या जाणार होत्या त्या कंपनीने राजस्थानच्या ‘रबरी’ जातीच्या 1500 शेळ्या-मेंढ्या राजस्थानहून नागपूरला आणल्या होत्या, पण अचानक चक्रे फिरली आणि हा कार्यक्रम तर रद्द झालाच, परंतु केंद्राने ही योजनाच मागे घेतली.

मेंढ्या आणि शेळ्या आज शनिवारी नागपूर विमानतळावरून निर्यात केल्या जाणार आहेत हे कळल्यावर काल (शुक्रवारी) जैन बांधवांनी याविरोधात नागपूरला मोठा मोर्चा काढला आणि ही निर्यात थांबवण्याची मागणी केली. हा मोर्चा निघताच केंद्रातील भाजपा सरकारने घूमजाव केले. भाजपाचे राज्यसभेतील नागपूरचे खासदार आणि धनगर समाजाचे नेते डॉ. विकास महात्मे यांच्यावर ही योजना यशस्वी करण्याची जबाबदारी होती. त्यांनी आज सकाळी जाहीर केले की, मी केंद्रीय व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोलून हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली. जैन बांधवांचे मत जाणून घेतल्यावरच पुढे निर्णय होईल. यामुळे तूर्तास ही योजना रद्द केल्याच्याच स्थितीत आहे.
ज्या कंपनीमार्फत शेळ्या-मेंढ्या निर्यात होणार होत्या, त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना या तडकाफडकी निर्णयाने धक्काच बसला, मात्र त्यांनी सरकार विरोधात कुठे वाच्यता करू नये म्हणून ही निर्यात रद्द केल्याने त्यांना जो तोटा झाला तो केंद्र सरकारने ताबडतोब भरपाई केला. यामुळे कंपनी गप्प झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More