जेल अधिकार्‍यांच्या खबरींना खराब अंडी दिल्याने बेदम मारहाणीत मंजुळाचा मृत्यू – eNavakal
News न्यायालय मुंबई

जेल अधिकार्‍यांच्या खबरींना खराब अंडी दिल्याने बेदम मारहाणीत मंजुळाचा मृत्यू

मुंबई- भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येने जेल अधिकार्‍यांच्या दोन खबरींना खराब अंडी दिली. म्हणून सर्व अधिकारर्‍यांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंजुळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी नवी धक्कादायक माहिती आज झालेल्या सुनावणीत कोर्टापुढे आली आहे. या खटल्यातील दुसरी साक्षीदार 33 वर्षीय महिला कैदी हर्षदा बेंद्रेची साक्ष नोंदवण्यास कोर्टाने सुरूवात केली आहे. 23 जूनला काही शुल्लक कारणावरून सर्व आरोपींनी मिळून मंजुळा शेट्येला बेदम मारहाण केल्याचे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने कोर्टाला सांगितले.
घटनेच्या काही महिने आधी जानेवारी 2017 मध्ये भायखळा जेलमध्ये नियुक्त झालेल्या जेल अधिक्षक मनिषा पोखरकर यांची कैद्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्याकधीही कुणाची विचारपूस करत नसत उलट येताजाता कैद्यांना शिवीगाळ करत. मंजुळाला मारहाण केल्यानंतर कोणीही तिला मदत केल्यास तिलाही तशीच मारहाण केली जाईल, अशी धमकीच पोखरकर यांनी बॅरेकमधील अन्य कैद्यांना दिली होती. त्यामुळे मंजुळाला त्याअवस्थेतही मदत करण्याची हिंमत कुणीही केली नाही असे या साक्षीदाराने कोर्टाला सांगितले. पोखरकर यांची भायखळा जेलमध्ये नियुक्ती झाल्यानंतर कैद्यांसाठी काम करणार्‍या समाजसेविकांनाही जेलमध्ये येण्यास मनाई करण्यात आली. 9 मे रोजी होणार्‍या पुढील सुनावणीतही हर्षदा बेंद्रेची साक्ष सुरू राहणार आहे. आजच्या सुनावणीत आरोपी कोर्टात हजर नसल्याने ही साक्ष नोंदवण्यास बचावपक्षाच्या वकिलांनी विरोध केला होता. मात्र या केसवर सध्या हायकोर्टाची नजर असल्याने सत्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली.
मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश शायना पाटील यांच्या कोर्टत ही सुनावणी सुरू आहे. मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सहा जणांविरोधात आरोप निश्चित केलेत. कलम 302 नुसार हत्याकरणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलंमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आलेत. जेल अधिक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 जेल पोलिसांनी हेतूपरस्पर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
23 जून 2017 च्या रात्री मंजूळा शेट्ये या महिला कैदीला अमानुष मारहाण करण्यात आली ज्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकूण 990 पानांचे आरोपपत्र दाखल झाले असून यात 182 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ज्यात एकूण 97 कैद्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तर सीसीटिव्ही फुटेज हे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचेही आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More