जेट विमानाचे इंदूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग – eNavakal
देश

जेट विमानाचे इंदूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली – १०० हून अधिक प्रवासी असलेल्या जेट विमानाने आज इंदुर येथील विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. विमान तब्बल ३६ हजार    फुटांपर्यंत पोहोचले होते. परंतु अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने सावधानता राखत इंदूर विमानतळावर लँडिंग केले. याबरोबरच प्रवाशांच्या जीवात जीव आला. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास जेट विमानाने हैदराबाद विमानतळावरून उड्डाण केले होते.

बोईंग ७३७ एयरक्राफ्ट ३६ हजार फुटापर्यंत पोहोचले असता अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला. यावेळी विमानाचा वेग तशी ८५० इतका होता विमानात ९६ प्रवासी तर ६ क्र्यू सदस्य होते. पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणत इंदूर विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. तंत्रज्ञानानुसार बोईंग ७३७ आणि एअरबस ए ३२० सारखे ट्वीन इंजिन एअरक्राफ्ट फक्त एका इंजिनवर सुद्धा  लँड करू शकते.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More