जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही कंपनीने ठोस व व्यवहार्य निविदा सादर न केल्याने दिवाळखोरी प्रक्रियेतून जेटची सुमारे ८,५०० कोटी रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्याचा निर्णय बँक समूहाने सोमवारी घेतला. यामुळे या बँक समूहाकडून जेटविरोधात दिवाळखोरीविरोधी कायद्यांतर्गत (आयबीसी कोड) राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) याचिका दाखल करण्यात येणार आहे.

एकूण कर्ज व तोट्याचा आकडा मिळून जेटमधील आर्थिक तूट ३५ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच थकीत कर्जाची रक्कम वाढल्याने तसेच अतिरिक्त कर्जाकरिता व्यापारी बँकांनी पाठ फिरवल्याने जेट एअरवेजने १७ एप्रिल रोजी उड्डाणे बंद केली. यामुळे समूहातील २२ हजार कर्मचाऱ्यांच्या बेरोजगारीला सामोरे जावे लागले. आता नव्या प्रक्रियेत कंपनी खरेदीसाठी उत्सुकांना न्यायाधिकरणापुढे प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. या प्रक्रियेत सध्या एस्सार स्टील, रुची सोया आदी कंपन्या प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या जेट एअरवेजचे मूल्य सोमवारी १६.७६ टक्क्यांनी घसरून ६८.३० रुपयांवर स्थिरावले.

जेटमधील भांडवली हिस्सा विकून देणी वसूल करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला होता. मात्र जेटमध्ये २४ टक्के हिस्सा असणाऱ्या एतिहाद एअरवेजचा अपवाद वगळता एकाही कंपनीने या प्रक्रियेत स्वारस्य दाखवले नाही. एतिहादने हिंदुजा समूहाच्या मदतीने जेटचा कारभार स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यांच्या अटी बँक समूहास मान्य झाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर जेटवर निर्णय घेण्यासाठी बँक समूहाची सोमवारी बैठक झाली. ‘जेटची समस्या ही दिवाळखोरी प्रक्रियेतूनच सोडवावी, असा निर्णय या प्रकरणी बराच ऊहापोह केल्यानंतर घेण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More