जेट एअरवेजच्या वैमानिकांचे मदतीसाठी पंतप्रधानांना पत्र – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे मदतीसाठी पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली – जेट एयरवेजच्या भारतीय वैमानिकांच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदत मागितली आहे. विमान कंपनी डबघाईला आल्यामुळे हजारो विमान कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. यामध्ये वैमानिक आणि अभियंत्यांचा समावेश आहे. कर्मचार्‍यांनी यापूर्वी नागरी विमान उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे देखील मदतीची मागणी केली होती.

कंपनी आर्थिक संकटात सापडल्यामुळे विमान कर्मचार्‍यांना आर्थिक तंगीला सामोरे जावे लागत आहे. काही कर्मचार्‍यांनी दुसर्‍या ठिकाणी नोकरी स्विकारली असली तरी बहुतांश कर्मचारी बेरोजगारीच्या गर्तेत सापडले असून त्यांना तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही. वैमानिक आणि अभियंत्यांना पगार न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. कंपनीवर सुमारे 8,500 कोटी रुपयांचे कर्ज असून 120 विमाने जमिनीवर उभी आहेत.  रोज 450 उड्डांऐवजी कंपनी 150 विमानांचे उड्डाण करीत आहे. कंपनी कर्जाची परफेड करू शकत नाही. भाडे देऊ शकत नाही तसेच कर्मचार्‍यांचा पगारही देऊ शकत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More