जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ‘सीडलेस’ काळी द्राक्षे पोहचली सातासमुद्रापार – eNavakal
News

जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ‘सीडलेस’ काळी द्राक्षे पोहचली सातासमुद्रापार

नारायणगाव- जुन्नर तालुक्यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यातून आज अखेर अडीचशे टन द्राक्ष चीन व श्रीलंका, नेदरलँड या देशात निर्यात झाली आहेत. निर्यातक्षम जंबो द्राक्षाला सध्या प्रतवारीनुसार शंभर ते एकशे वीस रुपये, तर दुय्यम दर्जाच्या द्राक्षाला पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे, अशी माहिती कृषी बापु रोकडे यांनी दिली.
दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका शेतकर्‍यांना बसत असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावत नुकसान होत यामुळे या वर्षी जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी हवामान विभागाच्या माहितीच्या आधारे छाटणीच्या वेळापत्रकात बदल केला अनेक शेतकर्‍यांनी सप्टेंबर महिन्यात आगाऊ छाटणी न करता ऑक्टोबर महिन्यात छाटणी केली होती. आगाऊ सप्टेंबर महिन्यात छाटणी केलेल्या जंबो व शरद सिडलेस द्राक्षाचा तोडणी हंगाम सध्या सुरू आहे. ऑक्टोबर छाटणीचा तोडणी हंगाम एक फेब्रुवारीपासून सुरू होईल. सध्या निर्यातक्षम जंबो द्राक्षाला प्रती किलो एकशे वीस रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून . मागील पंधरा दिवसांपूर्वी निर्यातक्षम द्राक्षांना 140 रूपये किलो बाजारभाव मिळत होता सध्या बाजारभावात घट झाली आहे.
स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना दुप्पट ते तिप्पट बाजारभाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकर्यांचा द्राक्ष निर्यातिकडे चांगला कल दिसून येत असून कृषी विभागाकडे तालुक्यातील 810 निर्यातदार शेतकर्‍यांनी 589 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षाची नोंदणी केली आहे.या वर्षी द्राक्षांची उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने द्राक्ष उत्पादन शेतकर्यांना अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली

मुंबई – मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली आहे. या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्यात जवळपास ५० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडच्या नव्या कामाला न्यायालयाचा लाल झेंडा

मुंबई – राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते बोरीवलीच्या कोस्टल रोडलाच्या नव्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More